
शहरातील कायनेटिक चौकाजवळ काही युवक दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. त्यानुसार, रात्रीच्या गस्तीपथकाने सापळा रचला.
अहमदनगर : शहरातील कायनेटिक चौकाजवळ दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगारांची पाच जणांची टोळी मंगळवारी (ता.5) रात्री कोतवाली पोलिसांनी पकडली. समीर खाजा शेख, विशाल राजेंद्र भंडारी, परवेज मेहमूद सय्यद, प्रतीक अर्जुन गर्जे व अमोल संजय चांदणे (सर्व रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
शहरातील कायनेटिक चौकाजवळ काही युवक दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. त्यानुसार, रात्रीच्या गस्तीपथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वरील पाच जणांना ताब्यात घेतले. मात्र, दोघे दुचाकीवरून पसार झाले. त्यांच्याकडून दुचाकी, लोखंडी रॉड, मोबाईल, मिरची पूड, कोयता असे साहित्य जप्त केले. चौकशीत समीर शेख व परवेज सय्यद यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस कर्मचारी गणेश धोत्रे, रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहीद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.