
राहुरी : मुळा डॅम फाटा येथे मुळा धरणाच्या उजव्या कालव्याजवळ अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर राहुरी पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवरील दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १३ हजार ६६५ रुपयांचा ९५० ग्रॅम गांजा व ३० हजारांची एक दुचाकी असा एकूण ४३ हजार ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओंकार साळवे (वय १९, रा. राहुरी), त्याचे सोबत एक अल्पवयीन मुलगा (रा. राहुरी) असे आरोपींचे नाव आहे.