Breaking News : गौरी प्रशांत गडाख यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गौरी गडाख यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तथापि, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अहमदनगर  ः ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (वय ३५) यांचे आज सायंकाळी येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गौरी गडाख यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तथापि, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी रुग्णालयात व गडाख यांच्या निवासस्थानी भेट देऊन तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद झाली नव्हती. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Prashant Gadakh passes away nagar breaking news

Tags
टॉपिकस
Topic Tags: