अकोल्यातील घोडसरवाडीची निवडणूक आरक्षणामुळे झाली रद्द

शांताराम काळे
Thursday, 7 January 2021

घोडसरवाडी येथे अनुसूचित जमातीचे सात कुटुंब असून, त्यांच्यासाठी 4 जागा सोडण्यात आल्याने इतरांनी या आरक्षणावर हरकत घेऊन न्यायालयात जाणे पसंद केले.

अकोले : तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून 14 जागांवर निवडणूक उमेदवारी अर्ज न आल्याने त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. घोडसरवाडी या ग्रामपंचायतमध्ये सातपैकी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे. 

चैतन्यपूर 1, कळंब 1, भोलेवाडी 3, शेरनखेल 1, जाचक वाडी 1, घोडसरवाडीत ६ अर्ज आलेच नाही. असे 14 ठिकाणी उमेदवारी अर्ज न भरले गेल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या जागा रिक्त ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. 

घोडसरवाडी येथे अनुसूचित जमातीचे सात कुटुंब असून, त्यांच्यासाठी 4 जागा सोडण्यात आल्याने इतरांनी या आरक्षणावर हरकत घेऊन न्यायालयात जाणे पसंद केले. त्यामुळे तेथे केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. तहसीलदारांनी ही निवडणूक रद्द केली आहे. 

हेही वाचा - मंत्र्यांच्या भगिनीची राहुरीतील शिक्षिकेला शिकवणी

निवडणुका संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्‍यात 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून, या निवडणुकीत 45 हजार 367 पुरुष व 42 हजार 96 महिला मतदार आपला मतदानाचा हकक बजावणार आहेत. 

272 जागांसाठी 553 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर दडी हजार कर्मचारी व तीनशे राखीव कर्मचारी असे एक हजार 800 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असणार आहेत. नुकतेच त्यांचे अगस्ती मंगल कार्यालयात प्रशिक्षण झाले असून, निवडणूक अधिकारी 33 कार्यरत आहेत, अशी माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghodsarwadi election in Akola canceled due to reservation