esakal | सिन्नर-घोटी महामार्गावर गो-मांस नेणारा टेम्पो पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Ghoti police have registered a case against the four for transporting beef from Tempo

घोटी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे दीड हजार किलो गो-वंशाचे मांस जप्त केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील दोघांना अटक केली.

सिन्नर-घोटी महामार्गावर गो-मांस नेणारा टेम्पो पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी पहाटे केलेल्या नाकाबंदीत भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पातून गो-मांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळले. घोटी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे दीड हजार किलो गो-वंशाचे मांस जप्त केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील दोघांना अटक केली.
 
घोटी पोलिसांनी सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी पहाटे नाकाबंदी केली होती. पोलिसांनी संशयावरून टेम्पो (एमएच 4 एचडी 5668) पकडला असता, आत भाजीपाला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तपासणी केली असता, टेम्पोत 1500 किलो गो-वंशाचे मांस आढळले. याबाबत घोटी पोलिसांनी अब्दुल मतीन इमानुल्लाह शहा (वय 35, रा. मुंबई), एहसान लोधी कुरेशी (वय 28, रा. मुंबई), कमरअली गुलाम कुरेशी (भारतनगर, संगमनेर) व वसीम कुरेशी (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

loading image
go to top