नगर जिल्ह्यात दहावी निकालात मुलींची आघाडी

दौलत झावरे
Wednesday, 29 July 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.

नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा 96.10 टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी मारली असून 97.61 टक्के मुलांचा निकाल लागलेला असून 94.92 टक्के मुलांचा निकाल लागलेला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी 69 हजार 441 जणांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले होते. त्यातील 69 हजार 53 जणांनी परीक्षा दिलेली आहे.

जिल्ह्यातील 66 हजार 360 जण पास झालेले असून त्यामध्ये 25 हजार 847 जणांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. 24 हजार 505 जण प्रथम श्रेणीत, 13 हजार 117 जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले असून 2691 जण पास झालेले आहेत. यामध्ये 36 हजार 753 विद्यार्थी असून त्यांची पास होण्याची टक्केवारी 94.92 टक्के असून मुलींची पास होण्याची संख्या 29 हजार 607 एव्हढी असून 97.61 टक्के निकाल लागला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls lead in 10th result in Nagar district