Kashinath Date : सुपे औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना प्राधान्य द्या : आमदार काशिनाथ दाते
Ahilyanagar News : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आमदार दाते म्हणाले, रांजणगाव, चाकण या औद्योगिक वसाहतीनंतर व पुणे, छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या मध्यावर सुपे औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय उद्योजकांनी येण्यासाठी प्राथमिकता दर्शवली आहे.
टाकळी ढोकेश्वर : तालुक्यातील सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये दहशतीचे वातावरण आहे, ते सुधारले पाहिजे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, पठार भागाच्या पाणीप्रश्नांची सोडवणूक करावी, यासह अन्य मागण्या आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केल्या आहेत.