esakal | कान्हूर पठारमध्ये चो-यांचे सत्र सुरूच; पारनेर रोडवरील घरातून साडे तीन लाखांचे सोने चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Gold jewelery stolen in Kanhur Plateau

घरामधून आतील खोलीत त्यांनी जाऊन कपाटातील वस्तूंची उचकापाचक केली. त्या ठिकाणी सखाराम ठुबे, त्यांची पत्नी व मुलगी व नातवंड त्या ठिकाणीच झोपलेले होते. मात्र याचा कोणलाच आवाज त्यांना आला नाही. अर्धा तासाने त्यांच्या पत्नी आशालता ठुबे या उठल्यानंतर त्यांनी मोबाईल लाईटचा हलका प्रकाश घरातील मुख्य हाॅलमध्ये दिसला. 

कान्हूर पठारमध्ये चो-यांचे सत्र सुरूच; पारनेर रोडवरील घरातून साडे तीन लाखांचे सोने चोरी

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हूर पठार (ता.पारनेर) येथे चो-यांचे सत्र सुरूच आहे. मागील महिन्यात नवलेवाडी येथील पाच लाख रूपयांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी ताजी असताना रविवारी पहाटे पारनेर रोडवरील घरातून साडे अकरा तोळ्याची सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली आहे. सखाराम ठुबे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

याबाबत माहिती अशी की, रविवारी पहाटे दोन वाजता पारनेर रोडवर निवृत्त प्राचार्य सखाराम कोंडाजी ठुबे (वय ७०) यांच्या घरातील अज्ञात चोरट्यांनी लोखंडी मुख्य दरवाजाची कडी उघडून आतील लाकडी दरवाजाचा कडी कोंडा हत्याराच्या सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामधून आतील खोलीत त्यांनी जाऊन कपाटातील वस्तूंची उचकापाचक केली. त्या ठिकाणी सखाराम ठुबे, त्यांची पत्नी व मुलगी व नातवंड त्या ठिकाणीच झोपलेले होते. मात्र याचा कोणलाच आवाज त्यांना आला नाही. अर्धा तासाने त्यांच्या पत्नी आशालता ठुबे या उठल्यानंतर त्यांनी मोबाईल लाईटचा हलका प्रकाश घरातील मुख्य हाॅलमध्ये दिसला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्यानंतर त्यांनी घरातील लाईट सुरू केल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला व त्यानंतर बेडरूममधील कपाट व कपड्यांची उचकापाचक केलेली आढळली व त्या ठिकाणी असणारे ३ लाख ४९ हजार २०० रूपये किंमतीचे साडेअकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व १ हजार २०० रूपये अशी चोरी झालेली आढळली. आपला पाठलाग न होण्यासाठी घरासमोर असणा-या दुचाकीची चावी देखील चोरांनी बरोबर नेली सर्वांना जाग आल्यानंतर परिसरातील नागरिकांना संपर्क केला. मात्र चोरांचा तपास कुठे लागला नाही, याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, हेड कॉन्स्टेबल ए.बी.पंधरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ञ यांच्यामार्फत पाहणी करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनखाली सुरू आहे.

ग्रामसुरक्षा दलाची गरज - उपसरपंच सागर व्यवहारे 

गावात व परिसरात सातत्याने चो-या वाढल्या आहेत. ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न नवलेवाडी येथील सोन्याची चोरी आणि आता ही साडेअकरा तोळे सोन्याची चोरी झाली. पूर्वी ग्रामसुरक्षा दल होते, त्यामुळे चो-यांचे प्रमाण कमी होते. पोलिसांनी या दलाची पुन्हा स्थापना करावी, त्याकरीता गावातील तरूण पुढाकार घेतील.

loading image
go to top