
श्रीरामपूर: शहरातील मुख्य रस्त्यावरील रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स या सराफ दुकानात १७ जुलै रोजी रात्री झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला. याप्रकरणी जालना जिल्ह्यातून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १४ लाख सात हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.