
अहिल्यानगर: बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. ही घटना शहरातील तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन ते २९ जुलै रोजी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान घडली. या बाबत गौरव अल्फ्रेड गमरे (वय ३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, ह. रा. लोहगाव, पुणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.