esakal | सोन्यासाठी उत्तराखंडमधून सुप्यात आले अन् १२ लाख गमावून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME

सोन्यासाठी उत्तराखंडमधून सुप्यात आले अन् १२ लाख गमावून गेले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर : स्वस्तात सोने मिळण्याच्या आमिषाला बळी पडून थेट उत्तराखंडमधून रेल्वेने बाप-लेक शिर्डीत आले होते. तेथून आपल्या मित्रांच्या ओळखीने सुपे (ता. पारनेर) येथे १२ लाख रुपये घेऊन सोने घेण्यासाठी आले. तेथे त्यांना सोने तर मिळाले नाहीच, उलट मार खाऊन १२ लाखसुद्धा गमवावे लागल्याने, हात हलवत परत जावे लागले.

उत्तराखंडमधील भुवनलाल कन्हैयालाल वर्मा यांच्या गावचे दोन जण शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये काम करीत आहेत. त्यांच्या ओळखीने स्वस्तात सोने घेण्याचे ठरले होते. त्यासाठी वर्मा व त्यांचा मुलगा सात दिवसांपूर्वी शिर्डीत आले. तेथे त्यांनी सोने खरे असल्याची खात्री प्रथम करून घेतली. त्यानंतर १२ लाख रुपयांत अर्धा किलो सोने घेण्याचे ठरले.

आज (ता. १४) ठरल्याप्रमाणे सायंकाळी चारच्या सुमारास पवारवाडीनजीक पैसे घेऊन या, असा निरोप आल्यानंतर वर्मा व त्यांचा मुलगा, तसेच शिर्डी येथील त्यांच्या गावाकडचे दोघे हॉटेल कामगार, असे चार जण सुपे येथे आले. ठरलेल्या ठिकाणी पवारवाडी नजीक असलेल्या जंगलात ते पैसे घेऊन पोचले. मात्र, तेथे जाताच त्यांना समोरच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मारहाण करीत त्यांच्याजवळील १२ लाख घेऊन पोबारा केला. भुवनलाल कन्हैयालाल वर्मा (रा. अल्मोडा, उत्तराखंड) यांच्यातर्फे सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

loading image
go to top