

Ahilyanagar’s Saraf Market in shock after goldsmith flees with 2 kg of gold worth ₹1 crore; police investigation underway.
Sakal
अहिल्यानगर: सराफ दुकानात काम करणाऱ्या सहा परप्रांतीय कारागिरांनी तब्बल एक कोटी रुपयांचे दोन किलो सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील गजबजलेल्या सराफ बाजारात हा प्रकार घडला असून, हे सोने आठ सराफांचे होते. सोने घेऊन पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकारामुळे सराफ बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.