esakal | कुकडी, घोडच्या लाभक्षेत्रासाठी ही आहे गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

This is good news for the benefit of Kukdi, Ghod canal

कुकडीच्या लाभक्षेत्रातील तालुक्‍यांत यंदा चांगला पाऊस होत असताना, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र त्याने दडी मारली होती. परंतु..

कुकडी, घोडच्या लाभक्षेत्रासाठी ही आहे गुड न्यूज

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्प जरी पुणे जिल्ह्यात असला तरी नगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे त्याकडे लक्ष असते. वरील तिन्ही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्पच असते. त्यामुळे ते पुणे जिल्ह्यातील धरणे कधी भरतात याकडे डोळे लावून असतात.

यंदा तिन्ही जिल्ह्यात मुबलक पाऊस आहे. परंतु कुकडी प्रकल्पात म्हणावा तसा पाऊस नव्हता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पाऊस पडला तर कुकडी आणि घोडखालील शेतकरी आनंदात असतात.

कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू आहे. आज प्रकल्पात 50 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, वडज धरण "ओव्हर-फ्लो' झाले असून, डिंभेही 73 टक्के भरले आहे. घोड धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला असून, येत्या काही दिवसांत तेही "ओव्हर-फ्लो' होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - नीलेश राणेंना कोरोनाची लागण..रोहित पवारांचे ट्विट

तालुक्‍यात यंदा चांगला पाऊस होत असताना, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र त्याने दडी मारली होती. तीन-चार दिवसांपासून तेथेही चांगला पाऊस होत असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली आहे.

कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे म्हणाले, की धरणांत आज 50 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एक टीएमसी क्षमतेचे वडज "ओव्हर-फ्लो' झाले. जास्त पाणीसाठा असणारे डिंभे धरणही 73 टक्के भरले आहे.

नव्या पाण्याची चांगली आवक राहिल्यास डिंभे लवकरच भरेल. त्यामुळे घोड धरणाला मोठा फायदा होईल. घोड धरण आजच 60 टक्‍क्‍यांच्या आसपास भरले आहे. त्यामुळे "घोड'ची अडचण दूर झाली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर