नीलेश राणेंना कोरोनाची लागण झाल्यावर रोहित पवार यांचे पुन्हा ट्विट

Rohit Pawar retweets after Nilesh Rane was infected with corona
Rohit Pawar retweets after Nilesh Rane was infected with corona

कर्जत ः कर्जत-जामखेडचे आमदार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यात ट्विटमुळे वादंग झाले होते. राणे यांनी एकेरीवर येत पवार यांचा पाणउतारा केला होता. नंतर या वादात मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही उडी घेतली होती. या वादामुळे दोघांमध्ये वितुष्ट आल्याची चर्चा होती. परंतु आमदार पवार यांच्या कृतीमुळे ती चर्चा संपुष्टात आली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे व आमदार रोहित पवार यांच्या मध्ये मागील काही दिवसांपूर्वी झालेली टीका-टिप्पणी खूप गाजली होती. त्यांच्या ट्विटरवर झालेल्या द्वंद्वाची राज्यात मोठी चर्चा रंगली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे ट्विट केले होते.

या पार्श्वभूमीवर सहानुभूती व धीर देण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. माजी खासदार नीलेश हे कर्जत तालुक्यातील दिघी गावचे निंबाळकर परिवाराचे जावई आहेत. माजी मंत्री कै. आबासाहेब निंबाळकर यांचे चिरंजीव जेष्ठ नेते राजेंद्र निंबाळकर यांचे ते जावई आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदार संघात आमदार आहेत. या दोघांतील ट्विटयुद्धामुळे मतदारसंघात पडसाद उमटले होते.

आता कोरोनामुळे राणे आजारी आहेत. त्यामुळे आमदार पवार यांनी दाखवलेल्या माणुसकीची चर्चा होत आहे. या दोन्ही युवा नेत्यांमध्ये सामंजस्य रहावे असेच निंबाळकर कुटुंबाचे स्नेह्यांना वाटते.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com