दिलासादायक! नगर जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७३.८६ टक्के

दौलत झावरे
Sunday, 16 August 2020

नगर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 512 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले. तर नव्याने 609 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्याची आतापर्यंतची आकडेवारी 9505 इतकी झाली.

नगर : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 512 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले. तर नव्याने 609 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्याची आतापर्यंतची आकडेवारी 9505 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 73.86 टक्के इतकी आहे. 
दिवसभरात 609 रुग्ण वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3211 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 242, अँटीजेन चाचणीत 207 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 160 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, संगमनेर एक, पाथर्डी एक, नगर ग्रामिण चार, श्रीरामपूर सहा, कॅन्टोन्मेंट चार, अकोले एक, शेवगाव एक, मिलीटरी हॉस्पिटल एक अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत शनिवारी 207 जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर 31, राहाता 14, पाथर्डी 13, श्रीरामपुर 17, नेवासा 21, श्रीगोंदा नऊ, पारनेर 11, अकोले 15 राहुरी सात, शेवगाव 17, कोपरगाव 18, जामखेड 13 आणि कर्जत 21 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 160 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 89, संगमनेर 12, राहाता चार, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 26, श्रीरामपुर चार, नेवासा दोन, श्रीगोंदा एक, पारनेर चार, अकोले तीन, राहुरी दोन कोपरगाव एक, जामखेड 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. 

512 घरी सोडले 
शनिवारी दिवसभरात एकूण 512 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 193, संगमनेर 18, राहाता 16, पाथर्डी 61, नगर ग्रा. 25, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 9, श्रीगोंदा 21, पारनेर 14, अकोले 19, राहुरी 17, शेवगाव सहा, कोपरगाव 20, जामखेड पाच, कर्जत 36 अशा रुग्णांचा समावेश आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news corona recovery rate in Nagar district is 74 percent