
श्रीगोंदे रेल्वेस्थानकावरून पूर्वी साखर, लिंबू, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. यातून हमालांसह अनेकांना रोजगारही मिळत होता.
श्रीगोंदे : एकेकाळी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या साखरेची वाहतूक करण्यासाठी येथील रेल्वेस्थानकाची चर्चा होती. मात्र मध्यंतरी ही वाहतूक बंद झाली. आज पुन्हा एकदा ही गोड बातमी समोर आली आणि पंचवीस वर्षांनी धक्का सुरू झाला. अंबालिका कारखान्याची साखर वाहतुकीने त्यास प्रारंभ करण्यात आल्याने रेल्वेस्थानकाला गतवैभव मिळणार आहे. (Farm goods will go abroad from Shrigonda railway station)
श्रीगोंदे रेल्वेस्थानकावरून पूर्वी साखर, लिंबू, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. यातून हमालांसह अनेकांना रोजगारही मिळत होता. तत्कालीन श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची साखर याच स्थानकावरुन बाहेर जायची. मात्र 1996 मध्ये हा धक्का बंद करण्यात आला.
हा धक्का सुरू करण्यासाठी नगर येथील रमाकांत गाडे यांनी पाठपुरावा केला. त्यांनी धक्क्याचे काम करण्यातही पुढाकार घेतल्याचे समजले. आता या स्थानकावरुन नागवडे, कुकडी, साईकृपा, साजन शुगर, अंबालिका, दौंड शुगर, घोडगंगा या कारखान्यांची साखर परदेशात जावू शकते. तसे झाल्यास या रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा चांगले दिवस प्राप्त होतानाच आसपासच्या परिसराचा विकासात्मक कायापालट होण्यास मदत होईल. यावेळी गाडे यांच्यासह नंदकुमार कोकाटे, बंडू तावरे, अस्लम खान व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.(Farm goods will go abroad from Shrigonda railway station)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.