
मंजूर घरकुलांचे पत्रे उडून गेल्याने आधीच कोरोनाने बेजार झालेल्या या कुटुंबियांवर संकटांचे आभाळच कोसळले होते.
कोपरगाव ः शहर व परिसरात सोमवारी (ता. 24) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांची पडझड झाली. सुदैवाने जीवित हानी टळली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. (Rain with strong winds in Kopargaon taluka)
शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. झाडाच्या फांद्या तारा व पत्रे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. नगरसेवकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला तातडीने ही घटना कळल्याने नगरपालिका प्रभागातील झाडावर जाऊन पडलेले पत्रे दूर केले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
वादळी वाऱ्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने 20 ते 25 कुटुंब उघड्यावर आले. मंजूर घरकुलांचे पत्रे उडून गेल्याने आधीच कोरोनाने बेजार झालेल्या या कुटुंबियांवर संकटांचे आभाळच कोसळले होते. त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. एकीकडे हाताला काम नाही. कुटुंब जगवावे कसे, असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे पावसाने नुकसान केले आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. युवक नेते विवेक कोल्हे यांनी तातडीने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून गोरगरिबांना शासनाने मदत करावी, अशी मागणी केली.(Rain with strong winds in Kopargaon taluka)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.