

Mahayuti Government Aims to End Drought, Says Padalkar at Kolhar Event
sakal
कोल्हार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदा ते नर्मदा जलयात्रेचे उत्तम नियोजन केले. यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाण्याचा राजकीय म्हणून वापर झाला. आता, महायुती सरकारच्या काळात राज्य दुष्काळ मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.