esakal | हैद्राबादमधील एस. गोपीकृष्णन यांच्याकडून कुंभारी देवस्थानला पाच फुटाची साईंची मूर्ती भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Gopikrishnan presents a five feet idol of Sai to Kumbhari Devasthan

ऐतिहासिक वारसा असलेल्या कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानाला हैद्राबाद येथील साईभक्त एस. गोपीकृष्णन यांनी 5 फुट 3 इंच उंचीची साईंबाबाची संगमरवरी मूर्ती व पादुका भेट स्वरूपात दिली.

हैद्राबादमधील एस. गोपीकृष्णन यांच्याकडून कुंभारी देवस्थानला पाच फुटाची साईंची मूर्ती भेट

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानाला हैद्राबाद येथील साईभक्त एस. गोपीकृष्णन यांनी 5 फुट 3 इंच उंचीची साईंबाबाची संगमरवरी मूर्ती व पादुका भेट स्वरूपात दिली. त्यांच्या या कार्याचे राघवेश्वर देवस्थानचे श्री श्री श्री 1008 प. पु. राघवेश्वरा नंदगिरी तथा उंडे महाराज यांनी आभार मानले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गोदावरी तीरावर वसलेल्या राघवेश्वर देवस्थानला कै. मोहन यादव परिवाराने सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांचे मित्र व कुंभारी येथील रहिवासी सतीश नीलकंठ यांच्याकडे साईबाबा मंदिराबाबत आणि साईंची मूर्ती भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.कै यादव यांनी त्यांचे हैद्राबाद येथील मित्र एस.गोपीकृष्णन यांचेशी चर्चा करून राघवेश्वर देवस्थानला साई बाबांची 5 फुट 3 इंच मूर्ती भेट दिली. गेल्या आठवड्यात जयपूर (राजस्थान)येथून ही मूर्ती कुंभारी मध्ये दाखल झाली असून नव्याने बांधलेल्या साई मंदिरात लवकरच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

कुंभारी येथील स्थानाला मोठे अध्यात्मिक महत्व असून भव्य गोशाले मध्ये जवळपास 50 गावरान गायींची देखभाल केली जात आहे. दक्षिणवाहिनी गोदावरी गंगेकाठी असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री अनेक दूरदूरचे भाविकांना सामर्थ्याची प्रचीती येत असते. धार्मिक अनुष्ठानाचे तपासाठी उंडे महाराजांचे मार्गदर्शनाखाली कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थान येथे भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात. देवस्थानच्या वतीने रोज 50 भक्तांना मोफत प्रसाद वाटप तर दरमहा प्रदोष व शिवरात्रीला कुंभारी मोठी जत्रा भरते.

संपादन : अशोक मुरुमकर