Anna HazareSakal
अहिल्यानगर
Anna Hazare: शासन निर्णय! अकोले तालुक्यात ११२ ठिकाणी गावकरीच राखणार गाव; अण्णा हजारेंच्या वाढदिवसाला अनोखी भेट
Ahilyanagar News : शासनाने त्याबाबत शासन निर्णय केला आहे. अकोले तालुक्याने ११२ गावांत ग्रामरक्षक दल स्थापनेचा संकल्प करून अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या वेगळ्या शुभेच्छा अकोले तालुक्याने दिल्या आहेत.
अकोले : अकोले तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू व अवैध धंदे रोखण्यासाठी गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन केले जाणार आहेत. तालुक्यातील १४७ पैकी ११२ ग्रामपंचायतींनी प्रांताधिकारी यांच्याकडे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी परवानगी मागणारे ठराव पाठवले आहेत.

