आता शेतकऱ्यांचा व तलाठ्यांचा वेळ वाचणार; सरकारकडून 'ई- पीक पाहणी’ मोबाईल ॲप तयार

Government of Maharashtra provides e crop survey app for farmers in nine talukas
Government of Maharashtra provides e crop survey app for farmers in nine talukas

अहमदनगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांचा व तलाठ्यांचा वेळ वाचावा याबरोबर शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावण्यासाठी मदत व्हावी म्हणून ई- पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे.

या ॲपसाठी सुरुवातील सात तालुके घेण्यात आले होते. त्यानंतर त्यात पुन्हा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील एक व औरंगाबाद येथील एक असे दोन तालुके वाढवण्यात आले आहेत. या माध्यमातून आता शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरुही झाले आहे. नेमकं काय असणार आहे या ॲपध्ये कसं काम करणार आहे, शेतकऱ्यांना काय माहिती द्यावी लागणार आहे, या ॲपच्या माध्यमातून काय माहिती मिळणार आहे. याचा हा घेतलेला आढावा.

‘ई- पीक पाहणी’ हे ॲप प्लेस्टोरमध्ये आहे. टाटा ट्रस्टच्या सौजन्याने महाराष्ट्र सरकारने हे ॲप तयार केले आहे. पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे नोंदवता यावी यासाठी हे ॲप तयार केले आहे. राज्यातील वाडा, अचलपूर, कामठी, बारामती, दिंडोरी, फुलंब्री व सेलू या सात तालुक्यात हे ॲप असणार आहे. त्यात पुन्हा दोन तालुके घेण्यात आले आहेत. ॲपच्या स्क्रिनवर सात तालुके म्हटलं आहे तर आतमध्ये नऊ तालुके दिसत आहेत. ॲपवर दिलेल्या माहितीनुसार ॲप वापरण्यासाठी कमीतकमी एक जीबी रॅम असलेला मोबाईल आवश्‍यक आहे. याशिवाय मराठी टायपींग करता येणार आहे.

जीपीएसद्वारे हे ॲप वापरता येणार असून यावर मराठी टायपिंग करता येणार आहे. थ्रीजी व फोरजी किंवा वायफायने हे ॲप वापरता येणार आहे. ॲपवर नोंदणी करण्यासाठी अद्यावत सात बारा व ८ अची प्रत, वैयक्तिक जमीन मालक आपली नोंदणी करु शकणार आहेत. सामायिक जमिनीसाठी ज्याचे नाव सात बारामध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदवले आहे, ते स्वतंत्रपणे नोंदणी करु शकतील.  मोबाईलवर प्लेस्टोरमधून ॲप डाऊलोड केल्यानंतर माहिती सांगण्यात आली आहे. त्यावर सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यावर सांगितलेली पूर्ण माहिती भरणे आवश्‍यक आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी ई– पीक पाहणीबाबत बैठक झाली होती. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार सर्वश्री नरेंद्र कवडे, संभाजी कडू- पाटील, तंत्रज्ञ प्रमुख निलेश खानोलकर उपस्थित होते.

कृषी विभागाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. यानुसार ई पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकरी संघटित होणार आहे. ई- पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नसून शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.

ई- पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव व चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते. महसूलमंत्री थोरात यांच्या म्हणण्यानुसार सध्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या नव्या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या आणि तलाठी यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची माहिती देणे अधिक सोपे होणार आहे.

या तालुक्यांचा सामावेश
पालघर जिल्ह्यातील वाडा, नागपूर जिल्ह्यातील कामठी, आमरावती जिल्ह्यातील अचलपूर, औरंगाबद जिल्ह्यातील फुलंब्री व सिल्लोड, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पुणे जिल्ह्यातील बारामती, परभणी जिल्ह्यातील सेलू व अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्यांचा सामावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com