शुभवर्तमान ः मुद्रा लोनबाबत सरकारने बँकांना दिला हा आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

कोरोनाच्या संकटात लाॅकडाऊनमुळे अनेक उद्योगव्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या कोवीड 19 या योजनेंतर्गत हा आदेश दिला आहे.

श्रीरामपूर ः कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील छोट्या मोठ्या उद्योग, व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी मुद्रा लोन अंतर्गत तातडीने कर्ज देण्याच्या सूचना केंद्र सरकरने दिल्या आहेत.

महाराष्ट्र बॅंकेच्या येथील शाखेंतर्गत 220 लाभार्थी खातेदारांना त्याचा लाभ दिला जात असल्याची माहिती बॅंकेचे शाखा प्रबंधक शरद कळमकर व उपप्रबंधक प्रदीप माळी यांनी दिली.

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या चाव्या खासगी व्यक्तीच्या हाती

कोरोनाच्या संकटात लाॅकडाऊनमुळे अनेक उद्योगव्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या कोवीड 19 या योजनेंतर्गत कर्ज रकमेच्या 20 टक्के रक्कम तातडीचे कर्ज म्हणून देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार येथील शाखेतून मुद्रा लोनअंतर्गत कर्ज घेतलेल्या 220 लाभार्थी व्यावसायिकांना बॅंकेत बोलावून त्यांना तातडीच्या कर्जाची रक्कम अदा केली जात आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठीही मदतीचा हात दिला असून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे तातडीचे कर्ज दिले जात असल्याचे कळमकर व माळी यांनी सांगितले.

लाॅकडाऊन काळात तसेच शिथिलतेनंतरही बॅंकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत आहेत. बॅंकेकडून मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government orders early payment of currency