ajit pawar
sakal
पारनेर - पठार भागातील दुष्काळ हटविण्यासाठी नियोजित पाणी योजना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना त्या नुकसानभरपाई दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.