शासनाच्या मोफत कोविड सेंटरची झाली आवराआवर

The government's free Covid Center was closed
The government's free Covid Center was closed

राहुरी : नगर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व तालुका ग्रामीण रुग्णालयांत शासनातर्फे सुरू केलेले मोफत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची रुग्णसेवा आजपासून बंद झाली.

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्व सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यापुढे गरजू कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी दिले आहेत.

कोरोना काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात शासनातर्फे कोरोना रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, सात दिवस विलिनीकरण, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान, ऑक्‍सिजन पातळी व रक्ततपासण्या, छातीचा एक्‍स-रे, गरजूंना ऑक्‍सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्‍टरांची व्यवस्था करण्यात आली.

खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चून मिळणारी वैद्यकीय सेवा शासनाच्या हेल्थ सेंटरमध्ये मोफत मिळू लागली. मागील सात-आठ महिने गोरगरीब रुग्णांसाठी शासनाचे कोविड हेल्थ सेंटर देवदूत ठरले.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद केले. आता नवीन वर्षात जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आले. 

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांत विस्कळित झालेली इतर आरोग्यसेवा आता पूर्वपदावर येणार आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, बाळंतपण, माता-बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण व इतर आंतररुग्ण सेवा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. 

  • बंद झालेले सेंटर 
  • -श्री विवेकानंद नर्सिंग होम, राहुरी फॅक्‍टरी (ता. राहुरी) 
  •  साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी (ता. राहाता) 
  •  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, शेवगाव 
  •  सी.आर.एच.पी., जामखेड 
  •  शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटर, अकोले 
  • उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी 
  • ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव 


राहुरी तालुक्‍यात जून-20पासून कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाली. राहुरी फॅक्‍टरी येथे उभारलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 163 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने, आजपासून कोविड हेल्थ सेंटर बंद केले आहेत. 
- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com