धान्यवाटपावेळी थम्बला ठेंगा, ई पॉसला पुन्हा पॉझ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

धान्यवाटपासाठी लाभार्थीचे "थम्ब इम्प्रेशन' घेताना दुकानदाराशी जवळून संपर्क येत होता. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. दुकानदारांच्या सुरक्षेसाठी लाभार्थीचे "थम्ब इम्प्रेशन' न घेता, आरसी क्रमांक घेण्याची सूट द्यावी, अन्यथा दुकाने बंद ठेवणार असल्याचा इशारा निवेदनात दिला होता.

श्रीरामपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप करताना ई-पॉस प्रणाली मार्च-एप्रिलमध्ये शिथिल केली होती. केंद्र सरकारने ही प्रणाली मेमध्ये पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील अनेक जिल्हे अजूनही "रेड' व "ऑरेंज' झोनमध्ये असल्याने, कोरोनाचा धोका कायम आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मे महिन्याच्या धान्यवाटपासाठी ई-पॉसची अट शिथिल केली आहे.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई व जिल्हा सचिव रज्जाक पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना ई-मेल पाठवून ही बाब लक्षात आणून दिली होती.

हेही वाचा - नगरकरांसाठी ही आहे गुड न्यूज

धान्यवाटपासाठी लाभार्थीचे "थम्ब इम्प्रेशन' घेताना दुकानदाराशी जवळून संपर्क येत होता. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. दुकानदारांच्या सुरक्षेसाठी लाभार्थीचे "थम्ब इम्प्रेशन' न घेता, आरसी क्रमांक घेण्याची सूट द्यावी, अन्यथा दुकाने बंद ठेवणार असल्याचा इशारा निवेदनात दिला होता. 

अखेर सरकारने मे महिन्यात धान्यवाटपासाठी ई-पॉसची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यानंतर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन, नंतर ही प्रणाली वापरण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grain distribution without thumb