जामखेड तालुक्यातही ग्रामपंचायतीमुळे राजकीय धुराळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. 

जामखेड : तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींच्या 158 प्रभागांतून 417 सदस्य निवडून देण्याकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकृती होणार आहे.

15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. 

तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, त्यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर आहे. दाखल अर्जांची 31 डिसेंबर रोजी छाननी होणार आहे.

हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या पोलिसांना पवारांचे अनोखे गिफ्ट

या प्रक्रियेसाठी 32 निवडणूक निर्णय अधिकारी, 864 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तहसीलदार नाईकवाडे व निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे.

जामखेड तालुक्‍यात 49 ग्रामपंचायतीमध्ये 80 हजार 375 मतदार आहेत. त्यात 37 हजार 271 स्त्री, तर 43 हजार 100 पुरुष मतदार आहेत. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gram Panchayat in Jamkhed taluka heated up the political atmosphere