

Grandmothers Struggles Remembered In A Unique Funeral Farewell As Granddaughters Carry Her Bier With Band Music And Fireworks
sakal
अहिल्यानगर : गावात सकाळपासून बॅण्डचा आवाज घुमत होता. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. एखाद्या उत्सवाची मिरवणूक निघाल्याचा भास व्हावा, असे चित्र होते. मात्र, ही मिरवणूक होती एका माउलीच्या अंत्ययात्रेची. आयुष्यभर कष्ट करून मुलाला घडविणाऱ्या शांताबाई कारभारी काळे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आनंदाने आणि सन्मानाने अखेरचा निरोप दिला. विशेष म्हणजे त्यांच्या नाती सई आणि राजनंदिनी यांनी आजीच्या पार्थिवाला खांदा देत आपले कर्तव्य बजावले.