

Brave Grandmother Battles Fire to Save Grandchildren, Suffers Critical Injuries
sakal
राहुरी : राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरील करपे इस्टेटमध्ये मंगळवारी दुपारी एका घरात अचानक आग लागली. यावेळी घरात दोन छोट्या मुली होत्या. बाहेरून आलेल्या मुलींच्या आजीने जीव धोक्यात घालून घरात शिरून दोन्ही नातींना सुखरूप बाहेर काढले. त्यात, भाजल्यामुळे आजी जखमी झाल्या. आसपासच्या नागरिकांनी मदत कार्य करून आग आटोक्यात आणली.