तुम्हाला वरई पीक माहितीय का, आदिवासींसह खाणारांचाही आहे फायदा

Great benefits to farmers from Varai crop
Great benefits to farmers from Varai crop

अकोले: तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये विशेष करून डोंगरउतार आणि डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या जमिनींवर भात खाचराची जागा सोडून वरई हे खरिपातील महत्त्वाचे पीक घेतले जाते. भाताखालोखाल वरई हे या भागातील खरिपातील मुख्य पीक मानले जाते.

असे असताना या पिकासाठी विशेष संशोधन आणि प्रकल्प याभागात राबवले गेले नाहीत. परंतु बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने गेल्या दहा वर्षांपासून या भागांमध्ये सातत्याने शेती आणि शेती विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पारंपारिक बियाणे संवर्धन आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचा विकास हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

वरई पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी बायफच्या कृषी शास्त्रज्ञांनी विशेष प्रयत्न करून लोक सहभागातून निवड पद्धतीने स्थानिक वाणांतून संशोधित केलेल्या दूध मोगरा या वरईच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाने अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना भुरळ पाडली आहे.

लोंबीची लांबी सुमारे तीस ते पस्तीस सेंटिमीटर एवढी लांब आहे. लोंबी लांब आणि भरीव असते, या जातीस सुमारे दहा ते बारा फुटवे येतात, सेंद्रिय खतांना भरपूर दाद देणारा वाण आहे. त्याच बरोबर जमिनीतील ओलाव्यावर स्थिर होणारा वाण व अधिक पावसात तग धरून राहणारा, रोग किडींना बळी न पडणारा हा वाण आहे.

शरीराला काय मिळतं

या वाणाचे हेक्टरी 25 ते 27 क्विंटल उत्पन्न मिळते. जवळपास हे इतर वणाच्या तुलनेत दुप्पट आहे. या वाणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उच्च प्रतीचे प्रोटीन, फायबर, तंतुमय पदार्थ फॉस्फरस, आयर्न इत्यादी मूलद्रव्य विपुल प्रमाणात सापडतात. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी हा वाण अधिक फायदेशीर असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

चालू हंगामात सुमारे 75 एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड तालुक्यात घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या राष्ट्रीय वनस्पती जनुकिय संस्थान नवी दिल्ली येथे या वाणाची नोंदणी करण्यात आलेली आहे. वर्ष 2017 मध्ये हा वाण तालुक्यात सर्वप्रथम सोनाबाई विठ्ठल भांगरे पिंपळदरावाडी यांच्याकडे लागवड करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड केली होती. त्यानंतर हे बियाणे जतन आणि वृद्धि करून मोठ्या प्रमाणावर बियाणे वाढविण्यात आले.

संपादन  - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com