

Mourning at the Wada as Family Remembers a Worthy Nephew
sakal
-महेश माळवे
श्रीरामपूर: अजितदादांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी त्यांच्या आजोळी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे झाला. शालेय शिक्षण बारामतीतील एम. ई. एस. हायस्कूलमध्ये झाले; मात्र उन्हाळ्याच्या सुटीत त्यांचे वास्तव्य हमखास देवळालीत असायचे. देवळालीतील त्यांचे कुटुंब मोठे आणि एकत्रित होते. जनसंघाचे कै. ल. ब. ऊर्फ अण्णासाहेब कदम हे त्यांचे मोठे मामा. त्याशिवाय कै. मुकुंदराव कदम, सर्जेराव कदम, कै. शरदचंद्र कदम असे चार मामा; तर कै. प्रभावती चव्हाण, सिंधुताई घाडगे-देशमुख आणि सुमनताई देशमुख अशा तीन मावशा.