Ahilyanagar Crime:
sakal
अहिल्यानगर: नगर-कल्याण रोडवरील सुयोग पार्कवर दोन गट मंगळवारी मध्यरात्री आपसात भिडले. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.