esakal | नगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Hasan Mushrif has said that the organization of the leaders of the district is bigger than the place of Ahmednagar district

मुश्रीफ म्हणाले, 'जिल्ह्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 670.36 कोटींचा निधी मंजूर आहे. कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकीमुळे यंदाचा 73.42 कोटी (11 टक्‍के) निधी खर्च करता आला.

नगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर शहर व जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. भंडारदरा परिसर पर्यटनासाठी स्वर्ग असून, त्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

जिल्हा नियोजन समितीची माऊली संकुलात बैठक झाली. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : कोविड लसीकरणास कोपरगावमध्ये प्रारंभ
 
मुश्रीफ म्हणाले, 'जिल्ह्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 670.36 कोटींचा निधी मंजूर आहे. कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकीमुळे यंदाचा 73.42 कोटी (11 टक्‍के) निधी खर्च करता आला. उर्वरित निधी मार्चपर्यंत खर्च करण्यासाठी दर 15 दिवसांना बैठका घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील रस्तादुरूस्तीसाठी सुमारे 92 कोटींचा निधी वर्ग केला आहे. 2020-21 वर्षासाठी 381 कोटी 39 लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यापेक्षाही जास्त निधी मिळावा, यासाठी 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत होणाऱ्या राज्याच्या आर्थिक नियोजन बैठकीत मागणी करणार आहे.'

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
भंडारदरा भागातील पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना तेथे नेणार आहे. हा परिसर स्वर्गासारखा सुंदर असून, त्याचा विकास होणे आवश्‍यक असल्याचे मुश्रीफ म्हणाले. 

जिल्ह्याचे आर्थिक नियोजन
 
* नगर शहरातील चार योजनांसाठी - 26 कोटी 
* पोलिसांसाठी 26 नवीन वाहने - 1 कोटी 70 लाख 
* ग्रामपंचायत निवडणुका व कोविड - 73 कोटी 42 लाख 
* रोहित्र खरेदी व वीज खांबांची कामे - 12 कोटी 
* शाळाखोल्या बांधकामे - 31 कोटी 
* कोविड - 24 कोटी 
* आदिवासी विकास - 46 कोटी 1 लाख 
* अनुसूचित जाती उपाययोजना - 144 कोटी 40 लाख 
* भूमिअभिलेख विभागासाठी 14 ईटीएस मशीन खरेदीचा प्रस्ताव