
अहिल्यानगर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील सराफ बाजार व वाहनांची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी खरेदी झाली. पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर नगरकरांचा भर होता. वाहनाची विधीवत पूजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरू होता. कुटुंबीयांसह वाहन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे शो-रूमचा परिसर गजबजला होता.