esakal | मी गद्दारांच्या यादीत नाही, तुम्ही किती हिंडलात बघा... गुलाबराव पाटलांचा राणेंवर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil's criticism of Rane

नीतेश राणे यांच्या वडिलांच्या मागे मी उभा राहत होतो, तेव्हा ते माझे नाव "फायटर बटालियन'मध्ये घेत. आता नारायण राणेंना मी कसा वाईट वाटायला लागलो? नैराश्‍यात असणाऱ्या माणसाला काही उद्योग नसतो.'' 

मी गद्दारांच्या यादीत नाही, तुम्ही किती हिंडलात बघा... गुलाबराव पाटलांचा राणेंवर पलटवार

sakal_logo
By
सूर्यकांत वरकड

नगर : ""मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझे नाव निष्ठावंतांच्या यादीत आहे; गद्दारांच्या नाही. कोणाच्या धमक्‍यांना मी भीत नाही. नेहमी शुद्धीत व भगव्याच्या धुंदीत राहतो. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांची औकात ओळखावी,'' अशा शब्दांत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी नीतेश राणे यांच्यावर टीका केली. 

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ""नीतेश राणे माझ्यावर टीका करतात. मी 36 वर्षे शिवसेनेत घातली आहेत. मी निष्ठावान शिवसैनिक अाहेत. कोणाच्या धमक्‍यांना भीक घालत नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. हेच राणे कॉंग्रेसमध्ये गेले, नंतर भाजपमध्ये गेले. मी निष्ठावान आहे. मी गद्दारांच्या यादीत नाही.

हेही वाचा - पारनेरपाठोपाठ राहुरीतही लष्कराचे सर्वेक्षण

नीतेश राणे यांच्या वडिलांच्या मागे मी उभा राहत होतो, तेव्हा ते माझे नाव "फायटर बटालियन'मध्ये घेत. आता नारायण राणेंना मी कसा वाईट वाटायला लागलो? नैराश्‍यात असणाऱ्या माणसाला काही उद्योग नसतो.'' 

उद्धव ठाकरे जनतेच्या हृदयात 
मंत्री पाटील म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला भाजपवाले धक्का लावू शकत नाहीत. ज्या माणसाने स्वतःकडे मुख्यमंत्रिपद सोडता कोणतेही खाते ठेवले नाही. ते आज जनतेची निःस्वार्थ सेवा करीत आहेत. जनतेच्या हृदयात असणाऱ्या माणसाला भाजपवाले बदनाम करू शकत नाहीत.'' 

loading image