पारनेरपाठोपाठ राहुरीतही लष्कराचे सर्वेक्षण... नवनव्या चर्चेमुळे शेतकऱ्यांत भीती

Survey by Army at Rahuri
Survey by Army at Rahuri

राहुरी : पारनेरपाठोपाठ राहुरी तालुक्‍यातील बारा गावांमध्ये के. के. रेंजच्या विस्तारीकरणासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केल्याची चर्चा आहे. नकाशा अद्ययावत करीत असल्याचे लष्करी अधिकारी सांगत आहेत. मात्र, कृषी विद्यापीठ व मुळा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झाल्याने, पुन्हा के. के. रेंजसाठी जमिनी अधिग्रहीत करून विस्थापित होण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

भारतीय लष्कराने खारेकर्जुने भागात 40 हजार हेक्‍टर क्षेत्र अधिग्रहीत करून युद्धसराव केंद्र सुरू केले. या केंद्रासाठी आणखी जमिनीची गरज भासल्याने 1980मध्ये नगर, पारनेर व राहुरी तालुक्‍यांतील 23 गावांतील 25 हजार हेक्‍टर क्षेत्राच्या अधिग्रहणाला सुरवात झाली.

2005मध्ये या गावांमध्ये रेड झोन घोषित करण्यात आला. आता पुन्हा लष्करी जवानांच्या पथकातर्फे गावांच्या सीमा, रस्ते, मोक्याच्या ठिकाणे, घरे, यांची सविस्तर माहिती घेतली जात आहे.

लवकरच हेलिकॉप्टरमधून हवाई सर्वेक्षण करून नकाशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. जमिनी अधिग्रहीत करणार की फक्त सीमानिश्‍चिती होणार, याविषयी ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. सध्या कुरणवाडी, चिंचाळे, गडदे आखाडा, म्हैसगाव भागात लष्कराची चार-पाच वाहने सर्वेक्षणासाठी फिरत आहेत. लष्कराचे अधिकारी ग्रामस्थांना कोणतीही माहिती देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com