Gunjalwadi Truck Accident, Junnar, Ahilyanagar-Kalyan Highway
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील चारंबा बा मंदिराजवळ गुळाची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक पलटी होऊन खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना शुक्रवार (दि. २) रोजी घडली. ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षण कठडे तोडल्याने अपघाताचे गांभीर्य वाढले. सुदैवाने ट्रक मंदिरापासून काही अंतरावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४५ एएफ १८१८ क्रमांकाचा ट्रक चौफुला येथून गुळाचा माल भरून गुजरातच्या दिशेने जात होता. गुंजाळवाडी येथील चारंबा बा मंदिराजवळ आल्यानंतर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षण कठडे तोडून खोल खड्ड्यात पलटी झाला.