esakal | 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांना मास्कपासून स्वातंत्र्य मिळेल
sakal

बोलून बातमी शोधा

In Guru Anand Ayurveda College covid Center started in Ahmednagar district

शहरातील युवकांनी पुढे येऊन माझ्याकडे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी आयुर्वेद महाविद्यालयातील यंत्रणा दिली. 

15 ऑगस्टपर्यंत नागरिकांना मास्कपासून स्वातंत्र्य मिळेल

sakal_logo
By
अमित आवारी

नगर (अहमदनगर) : शहरातील युवकांनी पुढे येऊन माझ्याकडे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी आयुर्वेद महाविद्यालयातील यंत्रणा दिली. चांगल्या विचारांचे अनुकरण नवीन पिढीने करावे. 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांना मास्कपासून स्वातंत्र्य मिळेल, अशी आशा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्‍त केली.

गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आजपासून गुरू आनंद कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा आमदार अरुण जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, डॉ. विजय भंडारी, प्राचार्या डॉ. अंजली देशमुख उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, कोरोना काळात आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची मदत पोचविण्याचा प्रयत्न केला. नगरमधील पोलिस दलानेही सेवाभावी वृत्तीने काम करत नगरची प्रतिमा उंचावण्याचे काम केले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व गुरु आनंद फाउंडेशने हे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरला जितो अहमदनगर, सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन युवक संघ, जय महावीर युवक मंडळ, महावीर प्रतिष्ठान या सात संस्थांचे सहकार्य मिळत आहे. आयुष काढ्याविषयीची माहिती डॉ. सुरजसिंह ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अमित मुथा यांनी केले. कमलेश भंडारी यांनी सूत्रसंचालन केले, शैलेश मुनोत यांनी आभार मानले.

या मिळणार सुविधा
गुरू आनंद कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना सकाळी योग शिक्षक योगाचे धडे देतील. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने आयुष काढा तयार केला आहे. या काढ्याचे आज उद्‌घाटन करण्यात आले. हा काढा रुग्णांना देण्यात येणार आहे. दिवसातून तीन वेळा जेवण देण्यात येणारा "मेनू' रोज वेगळा राहणार आहे. या सेंटरमध्ये रुग्णांना अल्पदरात ही सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर