कोल्हारमध्ये जुगार अड्ड्यावर सापडलं अर्ध्या कोटीचं घबाड

सुहास वैद्य
Monday, 14 September 2020

कोल्हार- लोणी रस्त्याच्या कडेला जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पथकाने काल (ता. 13) रात्री आठच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे तिरट नावाचा जुगार खेळला जात होता.

कोल्हार ः पोलिसांनी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या 41 जणांना अटक केली.

या धडक कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालात आठ लाख 19 हजार 140 रुपयांची रोकड, सात चारचाकी वाहने, दोन दुचाकी वाहने, 32 मोबाईल संच व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. 

कोल्हार- लोणी रस्त्याच्या कडेला जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पथकाने काल (ता. 13) रात्री आठच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे तिरट नावाचा जुगार खेळला जात होता.

हेही वाचा - कांद्याला मिळाला साडेतीन हजाराचा भाव

पोलिसांनी रोकड, वाहने, मोबाईल असा एकूण 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सागर बेदाडे, अरबाज पठाण, जुबेरखान पठाण, वसंत वडे, अमित गाडेकर, लालू चौधरी, अब्बास शेख, नवाब हुसेन, सतीश वैष्णव, रवींद्र चकोर, दीपक उंबरे, इम्रान मोमीन, गणेश सोमाशे, महेश बुरकुल यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 41 संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन अधिकारी अभिनव त्यागी, परिवीक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक आयुष नोपाणे आदींनी ही कारवाई केली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half a crore rupees was found at a gambling den in Kolhar