कांद्याला साडेतीन हजाराचा भाव; विक्रीसाठी मराठवाड्यातील शेतकरी नगरला

विनायक दरंदले
Monday, 14 September 2020

विशेष म्हणजे चार तास चाललेल्या खरेदी-विक्री व्यवहारांत तब्बल चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. 
घोडेगाव उपबाजारात आज पहाटेपासूनच परिसरासह औरंगाबाद, बीड भागातील शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल होत होते.

सोनई ः नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज 48 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चांगलेच खुलले.

विशेष म्हणजे चार तास चाललेल्या खरेदी-विक्री व्यवहारांत तब्बल चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. 
घोडेगाव उपबाजारात आज पहाटेपासूनच परिसरासह औरंगाबाद, बीड भागातील शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल होत होते.

हेही वाचा - अजबच हे गाव करतं दैत्याची पूजा

सकाळी अकराला प्रत्यक्ष लिलावांना सुरवात झाली. गेल्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला सरासरी 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.

आज प्रथम दर्जाच्या कांद्याला साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. काही शेतकऱ्यांना दर्जानुसार दोन ते अडीच हजार, पाचशे ते दीड हजार, गोलटी कांद्याला एकोणीसशे ते एकवीसशे, तर जोडकांद्यास चारशे ते पाचशे रुपये भाव मिळाला. चार तासांत चार कोटी पंधरा लाख 75 हजारांची उलाढाल झाली. 

 
आंध्र प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांत अधिक पाऊस झाल्याने तसेच राज्यातील सर्व हॉटेल सुरू झाल्याने कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळे आज विक्रमी आवक होऊनही कांद्याला चांगला भाव मिळाला. 
-संतोष वाघ, अडते, घोडेगाव .

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of onion is three and a half thousand