esakal | पारनेरमध्ये आढळले अर्धा डझन कोरोना रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Half a dozen corona patients found in Parner

अाता या पाच जणांच्या संपर्कात कोणकोण आले याची माहिती घेण्यात येत आहे.

पारनेरमध्ये आढळले अर्धा डझन कोरोना रूग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः तालुक्यात आज (ता. 4 ) एकदम अर्धा डझन कोरोना रूग्ण वाढले आहेत. त्यात कुंभारवाडी येथील एक व पिंपळगाव रोठे येथील पाच असे सहा रूग्ण एकदम वाढल्याने पारनेर तालुक्याने इतके दिवस अटकाव केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी एकदम हुसळी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनासह पारनेरकरांचे मात्र धाबे दणाणले आहे.
    
कुंभारवाडी येथील रूग्ण हा कान्हूर पठार येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आला होता. त्या मुळे त्याचा स्त्रा घेतला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे.

क्लिक करा - आमदार नीलेश लंके यांचा विजय अौटींना धक्का

पिंपळगाव रोठे येथील एक वद्धा चार दिवसापूर्वी मयत झाली होती. मात्र तिच्या मृत्यू संशयातीत असल्याने  तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी त्या वृद्धेच्या संपर्कातील 15 जाणांचे  स्त्राव घेतले होते. त्या पैकी आज सायंकाळी तिच्या संपर्कातील 15 पैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पारनेरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ही वयोवृ्द्ध स्त्री 21 जुनला मुंबई येथून पिंपळगाव रोठे येथे आली होती. मात्र, ती कधी आली याची कोणालाच माहिती नव्हती. मात्र, अाता तिच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थ हबकून गेले आहेत. 

हेही वाचा - दुःखद बातमी ः माजी मंत्री राम शिंदे यांच्या वडिलांचे निधन

अाता या पाच जणांच्या संपर्कात कोणकोण आले याची माहिती घेण्यात येत आहे. कारण ती  मयत वृद्धा मृत्यूपूर्वी कर्जुलेहर्या व  गावातील एका खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्याचेही समजते. मात्र, अाता ती हयात नसल्याने तिच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे कठीण झाले आहे.