‘हर घर तिरंगा’ची जनजागृती करत नेवाशातून अजमेरला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हर घर तिरंगा

‘हर घर तिरंगा’ची जनजागृती करत नेवाशातून अजमेरला रवाना

नेवासे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेवासे येथील मुस्लिम युवकाने आज नेवासे फाटा ते अजमेर या एक हजार किलोमीटर सायकलयात्रेस प्रस्थान केले. ‘हर घर तिरंगा’चा अनोखा संदेश घेऊन निघालेल्या या युवकाचे मार्गावर ठिकठिकाणी स्वागत होत आहे.

नेवासे फाटा येथील अल्ताफ शेखने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार करण्यासाठी सायकलयात्रेचा संकल्प वडील नजीर शेख व आई आयशा शेख यांना बोलून दाखविला. पत्नी हीना यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. आज भल्या पहाटे हातात तिरंगा झेंडा घेऊन त्याने सायकलयात्रेस प्रारंभ केला. औरंगाबाद, कन्नडमार्गे त्याने दुपारपर्यंत चाळीसगाव गाठले. रोज दोनशे किलोमीटर प्रवास करून तो पाच दिवसांत एक हजार किलोमीटरचा अजमेर टप्पा पूर्ण करणार आहे.

ओम साई सायकलिंग मंडळाचा सदस्य असलेल्या अल्ताफने यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, पंढरपूर, शिवनेरी किल्ला, वणीयात्रा सायकलवरून केली आहे.

जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी जातीय सलोखा वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. व्यसनांचे वाढलेले प्रमाण व व्यायामाकडील दुर्लक्षाने आरोग्याची समस्या वाढत आहे. निरोगी आणि फिट

राहण्यासाठी सायकलिंग खूप महत्त्वाचे असल्याचे त्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.रोज पहाटे पाच वाजता सायकलप्रवास सुरू करतो. मोठ्या गावात ‘हर घर तिरंगा’बाबत प्रबोधन करतो. रोज चौदा तासांत दोनशे किलोमीटर प्रवास करत, पाच दिवसांत एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणार आहे.

- अल्ताफ नजीर शेख, सायकलपटू, नेवासे

Web Title: Har Ghar Tiranga Public Awareness Ajmer Nevash

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..