
-विनायक दरंदले
सोनई : मातीचे गाडगे आणि मडक्याला आकार देताना मुलाच्या शिक्षणाला यशाचा आकार दिला. पणत्या, मातीचे बैल, लक्ष्मी, तसेच गणपतीच्या मूर्तींना रंग देताना मुलात पाहिलेला यशाचा रंगोत्सव दहावी परीक्षेच्या निकालानंतर स्वप्नपूर्ती करणारा ठरला. खुपटी (ता. नेवासे) येथील केतन रवींद्र शिर्के (९३.२०) टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम आल्यानंतर गावाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.