
शिर्डी : आजवर आपण अनेक सहकार परिषदा आणि संमेलने पाहिली. आठ देश, सात राज्यांसह महाराष्ट्रातील पतसंस्था प्रतिनिधींची एवढी मोठी उपस्थिती असलेली शिर्डीतील आंतरराष्ट्रीय सहकार परिषद पहिल्यांदाच अनुभवत आहोत. या परिषदेनिमित्ताने आम्ही प्रतीकात्मक सहकारी वृक्षाला पाणी दिले. आता सहकारातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निर्मळ मनाने फार मोठी शक्ती असलेली पतसंस्था चळवळ सुदृढ करावी, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.