Ahmednagar : हरीश्चंद्र गड अभयारण्यातील शेकरूंची संख्या वाढली; गतवर्षीची संख्या होती १८५

Giant Squirrel
Giant Squirrel

अकोले : हरिश्चंद्र गड़ अभयारण्यात गतवर्षीपेक्षा अधिक शेकरू वाढल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगनतीनुसार स्पष्ट झाले आहे. वन्य जीव विभागाच्या माहितीनुसार या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची नवीन २६०, जुने १८५ असे ४४५ घरटी आढळले आहेत.

Giant Squirrel
Sugarcane Crop : "किती माकड येतात ते बघतोच"; उसाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी बनला अस्वल

एक शेकरू चार ते पाच घरट्यांमधुन अधिवास करतो त्यांची संख्या ९२ असून हि संख्या गत वर्षी पेक्षा ३० ने वाढ़ली आहे. त्यामुळे वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यकता असून तसे प्रयत्न वनविभागाकडून होणे गरजेचे आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात यामुळे शेकरूंची गणना मे व जूनमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत सुरु असते. ही गणना "जीपीएस "(ग्लोबल पोझिशनींग ) या तंत्राद्वारे केली जाते.

यंदा त्या पद्धतीने केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू शकतो अशी आशा सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे व्यक्त केली आहे. अभयारण्यातील इतरत्र त्यांचा अधिवास आहे का , याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी.डी. पडवल यांनी सांगितले.

Giant Squirrel
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे नाकर्तेपणाचा कळस, आदित्य ठाकरे संतापले थेट लाज काढली

अकोले तालुक्यात शेकरूंची नोंद करण्याचे काम ९०टक्के पूर्ण झाले असून हरीश्चन्द्र गड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ४५५ घरटी आढळली असून एकूण ९२ शेकरू या परिसरात असून कळसुबाई घाटघर परिसरात गत वर्षि १७ शेकरू असून तिथेही ४३ घरटी आढळली आहे.

गतवर्षी प्राणी पक्षासह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळले असल्याची माहिती वनाधिकारी अमोल आडे यांनी दिली आहे. या वर्षी शेकरूंची गणना करता आली नाही असेही ते म्हणाले.

शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट, शेकरूंची डोळे गुंजी सारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम, पोटावर पिवळसर पट्टा , झुबकेदार लांब शेपूट असते.

शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटाची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलातील मध हे त्याचे खाद्य असते . महाराष्ट्रात भीमशंकर, कळसुबाई हरीशचंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात हे शेकरू आढळतात.

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com