

Harshad Bande, Gold Chain Returned, Shrirampur
sakal
टाकळीभान, : तीन लाखांची सोनसाखळी सापडली. क्षणभर कुणालाही मोह होईल, अशी परिस्थिती; मात्र आठवीतील हर्षद ज्ञानदेव बर्डे याने त्या मोहाला थारा न दिला नाही. घरच्यांनी शाळेत नेऊन सोनसाखळी परत केली. हर्षदच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याने त्याला सायकल भेट देत कौतुक केले.