
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : परिसरातील रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा पिकाच्या काढणीस सुरुवात झाली. पिक काढण्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा प्रश्न भेडसावत होता. त्यातच मजुरांच्या मजुरीचा दरही गगनाला भिडला होता. त्यामुळे मजुरांना वाढीव दर देत ज्वारी व हरभरा काढण्याचे काम सुरु असल्याचे चित्र तर काही ठिकाणी काढणी झालेल्या पिकाची ट्रॅक्टरला जोडण्यात आलेल्या मळणी मशीनच्या साहाय्याने करतानाचे चित्र पहायला मिळाले.
परिसरात सर्वत्रच ज्वारीचे पीक चांगले आहे. परिसरात सध्या विदर्भ, मराठवाडा भागातून आलेले मजूर पाहायला मिळत आहे. हे मजूर त्यांच्या स्वत:च्या गावात ज्वारी काढणीस जात नाहीत तर ते दुसऱ्या व लांबच्या गावामध्ये ज्वारी काढणीसाठी जातात. गावामध्ये ज्वारी काढणीस जादा मजुरी मिळणार नाही; मात्र, बाहेरगावी शेतकऱ्याची नड पाहून जादा मजुरीची मागणी करावयाची व जाण्या येण्याचे प्रवासाचे पैसेही घेता येतात, अशी शक्कल मजूर लढवत आहेत. पुरुष मजूर ५०० रुपये तर महिला ३०० ते ३५० रुपये रोजंदारी मागत आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी सामूहिक इरजिक लावून ज्वारीच्या काढण्या सुरू केल्या आहेत.
पावसाळाच्या शेवटी बराच काळ शेतात वाफसा न झाल्याने तसेच विहीर, ओढे, तलाव यामध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असल्याने येथील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी गहू व हरभरा या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या ज्वारीला बाजार नाही. मशागत करणे, बियाणे, पेरणी, खुरपणी, औषध फवारणी व वीजबिल आणि आता काढणीसाठी होणारा खर्च याचा सर्वांचा विचार केला तर ही मजुरी व होणारा खर्च परवडत नाही, अशी माहिती येथील स्थानिक शेतकरी संतोष आवारी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.