esakal | ते म्हणतात, "आत्मनिर्भर भारत' योजना शेतकऱ्यांना वाळीत टाकणारी 

बोलून बातमी शोधा

adv. satish palwe

"आत्मनिर्भर भारत' योजना शेतकऱ्यांना वाळीत टाकणारी आहे, असे मत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सतीश पालवे यांनी व्यक्‍त केले.

ते म्हणतात, "आत्मनिर्भर भारत' योजना शेतकऱ्यांना वाळीत टाकणारी 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : केंद्र सरकारने उद्योजक आणि नोकरदार वर्गासाठी "आत्मनिर्भर भारत' योजना सुरू केली. पण या योजनेत शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचा विचारच केलेला नाही. "आत्मनिर्भर भारत' योजना शेतकऱ्यांना वाळीत टाकणारी आहे, असे मत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सतीश पालवे यांनी व्यक्‍त केले. 

ऍड. पालवे म्हणाले, ""आज सर्वच शेतमाल निर्यात बंद आहे. शेतात राबवून मोठ्या कष्टाने टोमॅटो आणि इतर शेतमाल, भाजीपाला उत्पादित करणारा शेतकरी आज मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतमाल पडून आहे. शेतमाल विक्री करण्यासाठी गाव आणि शहरातील बाजार बंद आहेत.'' 

""व्यापारी शेतकऱ्यांना कोरोनाची भीती दाखवून अतिशय कमी किमतीत शेतमाल विकत घेऊन शेतकऱ्यांना लुटत आहेत. एका बाजूला कोरोनामुळे बाजार बंद आहेत आणि दुसरीकडे व्यापारी शेतमाल लुटून घेऊन जात आहेत. अशा दुहेरी संकटात शेतकरी असताना त्याला पॅकेज द्यायचे सोडून शासन उद्योजक आणि नोकरीवाल्यांचे पगार यासाठी "आत्मनिर्भर भारत' सारखे पॅकेज देत आहे. ज्यात शेतकरी कुठेच दिसत नाही. अशा पॅकेजचा आणि शासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.'' 

""शेतात राबणारा शेतकरी मदतीसाठी बांधावर उभा आहे. तो केंद्र आणि राज्य सरकारकडे डोळे लावून बसला आहे. त्याला बांधावर खते, बी बियाणे, कीटकनाशक शासनाने द्यावे अशी आमची मागणी आहे. अन्यथा शेतकरी आत्महत्या सत्र परत सुरू होऊ शकते. त्याला जबाबदार केंद्र आणि राज्य शासन असेल,'' असा इशारा शेतकरी चळवळीतील नेते ऍड. सतीश पालवे यांनी दिला आहे.