Ahilyanagar News : टाकळी काझी केंद्राचे आरोग्य बिघडले; वैद्यकीय सेवा मिळेना, गावकऱ्यांची कुचंबणा
आरोग्य केंद्र इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सुसज्ज आहेत. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नियुक्तीस नाही. येथील एक वैद्यकीय अधिकारी दीर्घ रजेवर आहेत. परिणामी लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळेच ग्रामस्थांनी आक्रमक होत केंद्राला कुलूप ठोकले होते.
Takli Kazi Villagers Struggle as Health Centre Fails to Provide Basic Caresakal
अहिल्यानगर : टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. सुसज्ज इमारत असतानाही लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. सेवा न मिळाल्यास केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.