

Free cancer screening through mobile van launched in Ahilyanagar district for oral, breast, and cervical cancer detection.
Sakal
-समीर दाणी
अहिल्यानगर: कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन सुरू केली आहे. नाशिक विभागाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही व्हॅन दाखल होणार आहे. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही व्हॅन जिल्हाभर फिरणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.