मालेगावकरांचे आरोग्य नगरकरांच्या हाती

वसंत सानप
Tuesday, 26 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक सेन्सिटीव्ह शहर म्हणून मालेगाव पुढे आले आहे. येथील महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी आहे. तेथील जनतेस रुग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव अतिसंवेदनशील झाले अाहे. मालेगावात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. नागरिकांना सेवा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील १९ डॉक्टरांचे पथक तिकडे जाणार आहे! एकंदर मालेगावकरांचे आरोग्य नगरकरांच्या हाती अवलंबून आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक सेन्सिटीव्ह शहर म्हणून मालेगाव पुढे आले आहे. येथील महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी आहे. तेथील जनतेस रुग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जावी, कामकाज सुरळीत सुरू राहावे, याकरिता नगर जिल्ह्यातील 19 वैद्यकीय अधिकारी गट यांच्या सेवा दिनांक 26 मेपासून सात दिवसाकरीता आरोग्य अधिकारी महानगरपालिका मालेगाव येथे वर्ग करण्यात आले आहेत.

हेही वाचा ः चर्चा तर होणार ः माझं काही खरं नाही, कधीही मी उडी मारीन

हे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकारी महानगरपालिका मालेगाव येथे रुजू होणे कामी उपसंचालक स्तरावरून आज कार्यमुक्तही करण्यात आले आहे. हे वैद्यकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी सकाळीच मालेगावला रवाना देखील झाले आहेत. मात्र, यापैकी जे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी महानगरपालिका मालेगाव येथे रुजू होणार नाहीत, त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करणेबाबत महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिल यांना प्रस्ताव पाठवण्यात येईल. साथरोग प्रतिबंध कायदा 1897 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल,असे निर्देश देण्यात आले आहेत.

सात दिवसासाठी वैद्यकीय सेवार्थ वर्ग करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे व त्यांची ठिकाणी अनुक्रमे अशी,
 डॉ. नवनाथ आव्हाड ,पाथर्डी. डॉ. शशांक शिंदे, जामखेड., डॉ. सचिन डफळ, कर्जत,  डॉ .सुदाम बागल ,पारनेर, यामध्ये कोपरगाव तालुक्यातील पंधरा डाँक्टरांचा समावेश आहे. डॉ. संदीप वैरागर कोपरगाव, डॉ.आदित्य पाटील ,धारणगाव, डॉ. अक्षय गायकवाड, शिंगणापुर, डॉ. सुरज जाधव ,कोळपेवाडी. डॉ. बाळासाहेब आडसरे,पढेगाव, डॉ. योगेश मालवडे, धामोरी,
डॉ. लखन राठोड,सांगवीभुसार, डॉ. संकेत पोटे,मुर्शतपूर, डॉ. अमरसींग राठोड ,धोत्री, डॉ.रेणू नागरे, रांजणगाव देशमुख.
 डॉ.भारत गव्हाणे, करंजी,  डॉ. प्रकाश पतंगे ,सुरेगाव, डॉ. कृष्णा पवार, तीनचारी, डॉ. सचिन खवाळ, गोधेगाव  डॉ.अरुण गताडे ,चांदेकसारे.

हे कोरोना योद्धे मालेगावकरांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health of Malegaon residents depends on Ahmednagar residents